– श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा येथे विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा शाळा समिती अध्यक्ष वामनराव फाये यांंचा वाढदिवस साजरा
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : पैसा हा व्यवहारासाठी लागतो पण जगण्यासाठी माणसे लागतात, हे माणसे जोडण्याचे प्रामाणिक कार्य वामनरावांनी केले असून वामनरावांंचे जीवनकार्य प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सेवा विभागाचे संयोजक सुनीलजी मेहर यांनी केले.
ते श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा येथे विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा शाळा समिती अध्यक्ष वामनराव फाये यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी सत्कारमूर्ती विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा अध्यक्ष तथा शाळा समिती अध्यक्ष वामनराव फाये, प्रमुख अतिथी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा चंद्रपूूर जिल्हा भाजपा महामंत्री संजय गजपूरे, विहिंंपचे जेष्ठ कार्यकर्ते बाबासाहेब कहारे, संस्था सचिव दोषहर फाये, श्री भगवान महादेव देवस्थान कमेटीचे अध्यक्ष डॉ. ते. ना. बुद्धे, संस्था सदस्य विमलताई फाये, शाळा समिती सदस्य वर्षाताई फाये, प्राचार्य एल. डब्लू. बडवाईक, प्राचार्य देवराव गजभिये, संस्कार पब्लिक स्कुलचे प्राचार्य देवेंद्र फाये, सिनेट सदस्य तथा भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये, संस्था सहसचिव प्रा. नागेश्वर फाये, संस्था सदस्य गुणवंत फाये, संस्था सदस्य हुंडीराज फाये, नगर पंचायता सभापती अँड. उमेश वालदे उपस्थित होते.
यावेळी डॉ. ते. ना. बुद्धे यांनी वामनरावजी फाये यांच्या सोबतची ५० वर्षापासूनची मैत्री असून त्यांनी प्रतिकूल परिस्थितीमधून यशस्वी जीवनाकडे वाटचाल केली आहे, असे मार्गदर्शनातून सांगितले.
संजय गजपुरे यांनी वामनरावजी फाये यांचे कार्य आम्हाच्या सारख्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारा असून त्यांचे शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक योगदान उल्लेखनिय असल्याचे विचार व्यक्त केले. विश्व हिंदु परिषदेचे जेष्ठ मार्गदर्शक बाबासाहेब कहारे यांनी १९८३ पाासून वामनरावांसोबत आपला संबध असून सामान्य कुंटुबात राहुनही कुंटुबांचे उदनिर्वाह करीत विहिंंपच्या माध्यमातून संघटन वाढीसाठी प्रामाणिकपणे कार्य केल्याचे सांगून त्यांनी अनेक जुन्या आठवणींंना उजाळा दिला. त्यांनी उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा देऊन त्यांंच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
यावेळी शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले व उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले. तसेच सोनी टिव्ही वरील कोण बनेगा करोडपती पहिल्या १० मध्ये निवड झाल्याबद्दल बेबीनंदा पेंदोर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शालेय गुणवंत विद्यार्थी यांचाही सत्कार करण्यात आला. संचालन नरहरी माकडे यांनी केले तर प्रास्ताविक मुख्याध्यापक एल. डब्लू. बडवाईक यांनी केले तर आभार एस. एम. सोनुले सर यांनी मानले. यावेळी श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा तसेच श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय कोरची येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बांधव, पालक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.