विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : सर्व काही व्यवस्थित नसताना आयुष्याचे रडगाणे न सांगता, अपयशाने खचून न जाता, स्वतः चे दु:ख अंतर्मनात ठेवून सकारात्मक दृष्टीने कुटुंब अर्थातच परिवार आणि शाळा व समाजाची प्रेरणा व उत्साह निर्माण करणारे धीरगंभीर व्यक्तीमत्त्व म्हणजे विश्व हिंदू परिषद जिल्हाध्यक्ष, शाळा समिती अध्यक्ष आदरणीय वामनरावजी फाये.
परिस्थिती कशीही असो स्वत:च्या जीवनात काहीतरी वेगळे करू इच्छिणाऱ्या व आपल्यासोबतच इतरांच्या आयुष्यात अपेक्षित बदल घडवून आणू इच्छिणारे महानुभाव म्हणजे वामनरावजी फाये साहेब आहेत. अन्यथा एका गरीब परंतु सुसंस्कृत कुटुंबात जन्मलेल्या फाये साहेबांना आपण आज जे बघतो ते अशक्यप्राय. आहे.
साहेबांचा जन्म कुरखेडा तालुक्यातील मालदुगी या खेड्यात धार्मिक प्रवृत्तीच्या असलेल्या वडील मोरेश्वरजी व आई वत्सलाबाई या दाम्पत्यांच्या पोटी 15 जुलै 1955 ला झाला. आई, वडील धार्मिक असल्याने मा. साहेबांना अध्यात्माचे बाळकडू घरात मिळून त्यांच्यावर तसे संस्कार पडले. अशा गरीब व सुसंस्कृत परिवारात वाढत असताना वयाच्या 16 व्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा प्रथम श्रेणीत पास केली. परंतु हलाक्याच्या परिस्थितीमुळे पुढचे शिक्षण घेण्यासाठी शहरात जाऊन शिकणे शक्य नव्हते. तथापि मन शिक्षणाकरिता धडपडत होते. त्याकरिता त्यांनी प्रयत्नही केले. परंतु माघारी यावे लागले. त्यानंतर उदरनिर्वाहासाठी वडिलांच्या व्यवसायात मदत करू लागले पण मन अस्वस्थ होते. आपण शिकू शकलो नाही परंतु आपल्यासारख्या असंख्य गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे ही तळमळ वाढत होती. इच्छाशक्ती प्रबळ असली की ध्येय गाळण्याकरिता मन काम करू लागतो म्हणतात तशीच एक संधी नियतीने दिली.
प्रभु श्रीरामाचे निस्सीम भक्त असल्यामुळे त्याचा पाईक होऊन आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था कुरखेडा या संस्थेची स्थापना करून श्रीराम विद्यालय कुरखेडा व श्रीराम विद्यालय कोरची या विद्यालयाद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे उघडले. प्रथम वर्ग 5 ते 10 पर्यंतचे शिक्षण देण्यात येत होते. परंतु विद्यार्थ्यांना वरील शिक्षण उपलब्ध व्हावे हा ध्यास मनात बाळगून कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाची निर्मिती केली. त्याचप्रमाणे संस्कार पब्लिक स्कूलच्या रुपाने इंग्रजी माध्यमाची शाळा दोन्ही ठिकाणी सुरू करण्यात आले आहे.
‘सेवा परमो धर्मा’ हा ध्यास मनी ठेवून या संस्था निर्माण केल्या म्हणूनच या सेवाकुरांचा विस्तार आज केवळ तालुकाच नाही तर जिल्हा बघत आहे. साहेब श्रीराम विद्यालय कुरखेडा आणि कोरची शाळा समिती अध्यक्ष, संस्था कोषाध्यक्ष तथा विहिंप जिल्हा अध्यक्ष तसेच गुरुदेव सेवा मंडळ सदस्य, भारतीय सुवर्णकार समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष, मार्गदर्शक म्हणून जबाबदारी सांभाळीत असून त्यांनी विविध क्षेत्रात अनेक पदे भुषविले आहेत. तसेच वामनरावजी फाये व परिवाराच्या वतीने कुरखेडा येथे प्रभु श्रीरामचंद्राच्या भव्य मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे. सामाजिक कार्यात सतत कार्यरत असणाऱ्या साहेबांमुळे आज जिल्ह्यात त्यांच्या विचारांची फळी निर्माण झाली आहे. मा. वामनरावजी फाये साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या परिवारातील सदस्य हे राजकीय, सामाजिक, सहकार तसेच शैक्षणिक क्षेत्रासह विविध क्षेत्रात कार्य करीत आहेत.
केवळ परिस्थिती तशी नाही म्हणून पुढे जाण्याची संधी न गमावता त्या संधीचं सोनं करणारी दृष्टी साहेबांमध्ये आहे. या कार्यात त्यांना आपलीशी वाटणारी, कौटुंबिकता जपणारी, प्रेम व जिव्हाळा देणारी, कुटुंबातील व इतर सदस्यांची साथ मिळाली हे त्यांच्या यशाचं गमकच म्हणावे लागेल आणि त्यामुळे समाजात वामनराव फाये हे व्यक्तीमत्व म्हणजे संस्काराचे केंद्र ठरले आहे. या व्यक्तीमत्वाला शतश नमन.
”शिखरे उत्कर्षाची सर आपण करीत राहावी !
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !!
आपल्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे !
आपल्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !!”
आपणास उदंड आयुष्याच्या आभाळभर हार्दिक शुभेच्छा.
– नंदू गोबाडे, पर्यवेक्षक श्रीराम विद्यालय तथा उ. मा. विद्यालय कोरची.