राज्य सरकारने पेट्रोल – डिझेलच्या किंंमतीत टॅक्स कमी करून नागरिकांना दिलासा देण्याची भाजपा युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांची मागणी

82

– तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राज्य सरकारने पेट्रोल – डिझेलच्या किंंमतीत टॅक्स कमी करून नागरिकांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी यांनी तहसीलदार यांच्या मार्फतीने राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल च्या किमती अनुक्रमे रु.9.5 रु आणि 7 रुपये नी कमी केल्याचे जाहीर केले.
असुन आता राज्य सरकार पेट्रोल डिझेल वरचा vat कमी करून जनतेला दिलासा देणारं का ? असा सवाल भारतीय जनता युवा मोर्चा विचारात आहे.

नोव्हेंबर २०२१ मध्येही केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलच्या किमती मध्ये कपात केली आणि राज्य सरकारांना विनंती केली की आपणही ही कपात करावी.भाजपा आणि NDA शासित राज्यांनी ही कपात केली आणि नागरिकांना दिलासा दिला. परंतु तेव्हाही महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या नागरिकांना दिलासा दिला नाही. किंंमतीत कपात केली नव्हती.फक्त आंदोलनाची नौटंकी करून जनतेला गुमराह करण्याचा प्रयत्न केला जात होता.
आता तरी किमान या सरकारने टॅक्स (vat) कमी करून पेट्रोल डिझेल किमतीत करावी व नागरिकांना दिलासा घ्यावा, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेेदनातूूून केली आहे. तहसीलदार यांना निवेदन देताना भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर, भाजयुमो शहर महामंत्री हर्षल गेडाम, भाजयुमो शहर महामंत्री राजू शेरकी उपस्थित होते.