शासनाची आम आदमी विमा योजना थंडबस्त्यात, शेकडो लाभार्थ्यांच्या विम्याची प्रलंबित भरपाई रक्कम त्वरित द्या

93

– भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये यांची मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : ग्रामीण भागातील भुमिहीन कुटुंबाचे प्रमुख व्यक्तीस विम्याचे संरक्षण देण्याकरिता आम आदमी विमा योजना दिनांक २ ऑक्टोबर २००७ पासून राबविण्यात येत असून या योजनेच्या शेकडो लाभार्थ्यांच्या विम्याचे भरपाई रक्कम प्राप्त झाली नसल्याने सदर योजना थंडबस्त्यात असून शेकडो लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत. या प्रलंबित लाभार्थी यांना त्वरित विम्याची भरपाई द्या, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष तथा कुरखेडा पंचायत समितीचे माजी सदस्य चांगदेव फाये यांनी केली आहे.
भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून लाभार्थींंचा विमा उतरविण्यात येतो व संपूर्ण विम्याची रक्कम शासनाकडून भरण्यात येतो. सदर योजना ग्रामीण भागातील भूमिहीन कुंटुबातील १८ ते ५९ वयोगटातील रोजगार करणाऱ्या कुंटुंब प्रमुखास नैसर्गिक मृत्यू, अपघाती मृत्यू, अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास किंवा दोन्ही डोळे किंवा दोन्ही पाय निकामी झाल्यास, या अपघातामुळे एक डोळा किंवा एक पाय निकामी झाल्यास अनुक्रमे ३००००/- रुपये, ७५ हजार रुपये ३०५००/- रुपये देण्यात येतो. अशा या योजनेच्या जवळपास कुरखेडा तालुक्यातील जवळपास ५० लाभार्थी व गडचिरोली जिल्ह्यातील शेकडी लाभार्थी यांनी तलाठी कार्यालय व तहसिल कार्यालय मार्फतीने या योजने अंतर्गत विम्याची भरपाई रक्कम करिता अर्ज सादर केले आहे. पंरतु मागील अनेक वर्षांंपासून या योजनेपासुन लाभार्थी वंचित असुन नविन लाभार्थी या योजनेकरिता अर्ज सादर करीत आहेत. त्यामुळे या आम आदमी विमा योजनेच्या लाभार्थी यांना विमा भरपाई रक्कम देण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये यांनी केली आहे.