गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर हत्तीकॅम्प स्थलांतरित करू नये : खा. अशोकजी नेते

80

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : कमलापूर हत्ती कॅम्पविषयी खा. अशोकजी नेते यांनी दिल्ली येथे उपसंचालक वन्यजीव अधिकारी भारत सरकार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वन्यप्राण्यांविषयी समस्या जाणून घेऊन यासंदर्भात स्थलांतरित करण्याचे अधिकार राज्यसरकारचेच असल्याने तरीपण या संबंधित गडचिरोली जिल्ह्याचे स्थानिक खासदार अशोकजी नेते असल्याने केंद्रसरकारकडून मानवी जीवांच्या रक्षणासाठी किंवा प्राण्यांच्या जीवाच्या संरक्षणासाठी जे काही प्रयत्न केले जाईल यासाठी खासदार अशोकजी नेते यांनी प्रयत्न केले.
महाराष्ट्रामध्ये गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम, अविकसित, उद्योगविरहित, नक्षलप्रभावी, जिल्ह्याची ओळख आहे. या जिल्ह्यात 78% व्याप्त जंगल असून अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे हत्ती कॅम्पसाठी प्रसिद्ध आहे. कमलापूर येथील हत्ती कॅम्पमधील हत्ती कधी व्हायलेट झाले नाही. त्यांच्यामुळे लोकांना काही त्रास नाही. या हत्ती कॅम्पच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये पर्यटनस्थळ म्हणून थोड्याफार प्रमाणात रोजगार मिळत आहे. परंतु कमलापूर येथील हत्तीकॅम्प गुजरात येथे स्थलांतरित करण्यासाठी हालचाली चालू झालेल्या होत्या त्यामुळे जनतेमध्ये सरकारविरुद्ध नाराजी दिसून आलेली होती.
कारण गुजरातपेक्षा गडचिरोली जिल्ह्या हा जंगल व्याप्त जिल्हा असल्याने हती कॅम्पला राहण्यासाठी पोषक वातावरण,व शांत स्वभाव निर्माण झालेला आहे. त्यासाठी हतीकॅम्पला सुविधाजनक, पर्यटन व रोजगार मिळावा याकरिता खा. अशोकजी नेते यांनी दिल्ली येथे मान. डॉ. सुनील शर्मा (IFS) उपसंचालक, वन्यजीव भारत सरकार नवी दिल्ली यांना अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील हत्ती कॅम्प स्थलांतरित करू नये, अशी सूचना व प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले.