जिल्ह्यातील हत्तींचे स्थलांतरण त्वरित रोखण्यात यावे अन्यथा मोठे जनआंदोलन करण्यात येईल : युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लॉरेन्स गेडाम

104

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर, पातानील येथील हत्तींचे स्थलांतरण करून ते जामनगर (गुजरात) येथील खाजगी प्राणिसंग्रहालयात नेण्याकरिता प्रशासनाने मान्यता दिली असून याचा जिल्ह्यातच नाही तर सम्पूर्ण महाराष्ट्रतही वण्यप्रेमींंकडून विरोध होत आहे. जिल्ह्यातील वनसंपत्ती आणि येईल वन्यजीव हेच जिल्ह्याचा वैभव आहे आणि ते नष्ट करू नका. त्यामुळे जनसामान्यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्या भावना लक्ष्यात घेऊन हत्तीच्या स्थलांतरावर त्वरीत रोख लावन्यात यावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लॉरेन्स गेडाम यांनी केली आहे. अन्यथा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनात आणि जिल्हाध्यक्ष लॉरेन्स गेडाम यांच्या नेतृत्वात युवक काँगेसच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, अश्या सूचनाही गेडाम यांनी दिल्या.
हतीच्या वास्तव्या साठी कमलापूर हेच उत्तम ठिकाण आहे. जंगल, तलाव सभोवताल डोंगर असा निसर्गरम्य वातावरण त्या ठिकाणी असून हत्तीसाठी व पर्यटकांसाठी हे उत्तम ठिकाण आहे. याउलट जामनगर येथील संग्रहालयात 6 हत्ती ठेवण्याकरिता 5 हजार square मीटर च्या जागेची परवानागी संबंधीत संस्थेने मिळवली असून याच संस्थेने देशभरातून 106 हत्ती ताब्यात घेतले असल्याचे कळते. मग इतक्या मोकळ्या वातावरणात राहणाऱ्या हत्तींना तिथला वातावरण खरच योग्य राहील का? असा प्रश्नही लॉरेन्स गेडाम यांनी उपस्थित केला आहे.