काँग्रेसला अधिक मजबूत करण्याकरिता मोठ्या संख्येने युवकांना संघटनेत जोडा : महेंद्र ब्राम्हणवाडे

104

– युवक काँग्रेस राबविणार गाव तिथे शाखा अभियान

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : काँग्रेस हा जुना पक्ष असून स्वातंत्र्य लढ्यापासून ते स्वातंत्र्योत्तर भारताच्या निर्मितीमध्ये पक्षाचे अमूल्य योगदान आहे. काँग्रेस पक्षाने नेहमीच समाजातील सर्व घटकांना बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला. पण सद्यास्थितीत भाजपच्या वतीने जाती धर्माच्या नावाखाली युवकांना तोडण्याचे काम होत आहे. अश्या परिस्थितीत काँग्रेसला अधिक मजबूत करण्याकरिता व देशात एकोपा टिकूवून ठेवण्याकरिता मोठ्या संख्येने युवकांना संघटनेत जोडा, अशा सूचना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
जिल्हा युवक काँग्रेसची पहिली पदाधिकारी बैठक शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे पार पडली. यावेळी ते सभेचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. सोबत महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉ. नितीन कोडवते, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिव शिवानी वडेट्टीवार, जिल्हा युवक काँग्रेसचे प्रभारी डॉ. प्रणित जांभुळे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लॉरेन्स गेडाम, शहर काँग्रेस अध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा महासचिव तथा जेष्ठ नेते समशेखान पठाण, जिल्हा सचिव सुनील चदगुलवार, काँग्रेस नेते दामोदर मंडलवार, काँग्रेस नेत्या पुष्पा कुमरे, अतुल मल्लेलवार, कुणाल पेंदोरकर, आकाश परसा, महेश जेलेवार, श्रीकांत वैद्य, पराग वाघाडे, वेदांत कापकर, अंकुश गाढवे, मोहन नामेवार, निजान पेंदाम, सुधीर बांबोळे, भास्कर बांबोले, पंकज नैताम, आकाश सहारे, कैलास भांडेकर, जितू चलाख, दादू महाडोळे, निकेश सहारे, साई सिलमवार, शरदगिरी पुंजे, अमित तलांडे, कमलेश खोब्रागडे, गौरव एनपरेड्डीवार, विपुल येलेटीवार, कुणाल ताजने, प्रतीक्षा शिडाम सह अनके मान्यवर व जिल्ह्याभरातून युवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गाव तिथे शाखा उपक्रम राबविणार असल्याचे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लॉरेन्स गेडाम यांनी सांगितले.