शेतकऱ्यांना बारमाही पाणी देण्यासाठी जलसंधारण विभागाने प्रयत्न करावे : खा. अशोक नेते यांचे प्रतिपादन

93

– जिल्हा जलसंधारण अधिकारी गडचिरोली कार्यालयाचे उद्घाटन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात सिंचनाची सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना बारमाही पिके घेण्यास अडचण होत आहे. सिंचनाच्या सुविधेअभावी शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. आज गडचिरोलीत जलसंधारण विभागाच्या विभागीय कार्यालयाचे उदघाटन होत आहे ही आनंदाची बाब आहे या कार्यलयामार्फत शेतामध्ये तलाव, बोडी, छोट्या नद्यांवर लहान बंधारे प्रस्तावित करून शेतकऱ्यांना बारमाही सिंचनाची सोय उपलब्ध करण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घ्यावे, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले. जलसंधारण कार्यालयाचे उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

आज दि. 1 मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन जलसंधारण विभागाच्या वतीने जिल्हा जलसंधारण अधिकारी गडचिरोली कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कल्याण तथा अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मा. ना. राजेंद्र पाटील यद्रावकर यांच्या हस्ते गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते, आ. कृष्णाजी गजभे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
उद्घाटक ना. मा. राजेंद्र पाटील-यड्रावकर राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य व कल्याण अन्न व औषध प्रशासन म.रा., विशेष अतिथी मान. खा. अशोकजी नेते गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री, अनु.जनजाति मोर्चा, मान. कृष्णाजी गजबे, आमदार, आरमोरी विधानसभा क्षेत्र, मान. डॉ. दिलीप पांढरपट्टे सचिव मृदा व जलसंधारण विभाग, मान. धनाजी पाटील जिल्हाधिकारी प्रभारी गडचिरोली. मान. व्ही. एम. देवराव अप्पर आयुक्त तथा मुख्य अभियंता प्रादेशिक क्षेत्र नागपूर, मान. कविजीत पाटील प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मान. वासुदेवजी शेडमाके, जिल्हा अध्यक्ष शिवसेना गडचिरोली. मान. सुनील पाटील आदींच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला.