चातगाव येथील डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजमध्ये आजपासून दोन दिवसीय टॅलेन्ट कॉन्टेस्ट, वनौषधी लागवड- संवर्धन प्रक्रिया, बाजारपेठ यावर मार्गदर्शन व मोफत रोगनिदान, औषध वाटप शिबिराचे आयोजन

141

– कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मंत्री ना. विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील चातगाव येथील डॉ. साळवे नर्सिंग कॉलेज स्टुंडटस् असोसिएशन द्वारा टॅलेन्ट कॉन्टेस्ट (नृत्य स्पर्धा), वनौषधी लागवड- संवर्धन प्रक्रिया, बाजारपेठ यावर मार्गदर्शन व मोफत रोगनिदान, औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, खार जमिनी विकास व बहुजन कल्याण मंत्री मा. ना. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते आज रविवार, 1 मे रोजी दुपारी 12 वाजता डॉ. साळवे नर्सिंग काॅलेज चातगाव येथे होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा माजी नगराध्यक्ष ऍड. रामभाऊ मेश्राम तर प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील, उपवनसंरक्षक मिलेश शर्मा, उपपोलीस अधीक्षक प्रविण डांगे, जिल्हा कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, दै. पुण्यनगरीचे जिल्हा प्रतिनिधी अविनाश भांडेकर, दै. सकाळचे जिल्हा प्रतिनिधी मिलिंद उमरे, प्रसिद्ध अधिवक्ता (फौजदारी) ऍड. चंद्रराजजी पांडे, चातगावचे वनपरिक्षेत्राधिकारी संजय पडवे, डॉ. साळवे नर्सिंग काॅलेज चातगावचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद साळवे, महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघ गडचिरोलीचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष चंदू प्रधान, डॉ. साळवे नर्सिंग काॅलेज चातगावचे कोषाध्यक्ष डॉ. अमित रामने, चातगावचे सरपंच गोपाल उईके, चातगावचे माजी सरपंच नारायण सय्याम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाचा बक्षीस वितरण सोहळा सोमवार, 2 मे रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली जि. प. चे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजकुमार निकम तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, दै. पुण्यनगरीचे जिल्हा प्रतिनिधी अविनाश भांडेकर, चातगावचे वनपरिक्षेत्राधिकारी संजय पडवे, डॉ. साळवे नर्सिंग काॅलेज चातगावचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद साळवे,  डॉ. साळवे नर्सिंग काॅलेज चातगावचे कोषाध्यक्ष डॉ. अमित रामने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. साळवे नर्सिंग काॅलेजच्या प्राचार्या दिप्ती तादुरी, उप प्राचार्या स्वागता खोब्रागडे, स्टुंडटस् असोसिएशनच्या अध्यक्षा निकिता सडमेक, उपाध्यक्षा वनश्री दाजगाये, उपाध्यक्षा शीतल पदा, सचिव प्रणाली तुलावी यांनी केले आहे.