विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजीतदादा पवार हे आज शुुक्रवारी गडचिरोली जिल्हयाच्या दौऱ्यावर आले असता माजी आमदार तथा महासचिव महा. प्रदेश काँँग्रेस कमिटी व डी पी.डी.सी. सदस्य डाॅ. नामदेवराव उसेंडी यांच्या नेतृत्वात काँँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व नामनिर्देशित डी.पी.डी.सी. सदस्यांनी पुष्पगुच्छ देवून मा. ना. अजीतदादा पवार यांचे स्वागत केले.
या निवदेनाच्या माध्यमातून गडचिरोली जिल्हयाच्या आदिवासी, नक्षलग्रस्त व आकांक्षित जिल्हा असल्याने महाराष्ट्राच्या इतर जिल्हयाच्या विकासाच्या तुलनेत गडचिरोली जिल्हा बराच माघारलेला आहे. गडचिरोली जिल्हयाचा मानव विकास निर्देशांक अतिशय कमी असून जिल्हयातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न कमी आहे. या जिल्हयात शिक्षणाचा, सिचंनाचा, आरोग्याचा व इतरही विकास कामांचा अनुशेष इतर जिल्हाच्या तुलनेत खूप मोठा आहे. त्याकरीता गडचिरोली जिल्हयातील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतीपुरक व्यवसाय उदा. दुग्ध व्यवसाय, मत्स्यव्यवसाय, कुकुटपालन, फळबाग लागवड इत्यादी योजना मोठया प्रमाणात राबवावे, शेतकऱ्यांंना धानाच्या बोनसऐवजी एकरी 10 हजार रुपये शेती लागवड पूर्वीच्या मशागतीकरिता अनुदान देण्यात यावे, गडचिरोली जिल्हयात 7 ते 8 वाहना-या नदया व नाल्यावर ब्रीज बंधारा बांधण्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावे, गडचिरोली जिल्हयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुर करावे व इतर ही जिल्हयातील विकासाचे मुद्दे यावर चर्चीले गेले. यावेळी माजी आमदार तथा महासचिव महा. प्रदेश काँँग्रेस कमिटी व डी पी.डी.सी. सदस्य डाॅ. नामदेवराव उसेंडी, जेष्ठ नेते हसनअली गिलानी, राष्ट्रवादी युवा नेते व डी.पी.डी.सी. सदस्य ऋतुराज हलगेकर, जिल्हा कोषाध्यक्ष काँग्रेस कमिटी प्रभाकर वासेकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष व डी पी.डी.सी. सदस्य रवींद्र वासेकर, माजी जि. प. उपाध्यक्ष व डी पी.डी.सी. सदस्य जीवन नाट, डी. पी.डी.सी. सदस्य राजगोपाल सुर्वोवार, शिवसेना नेत्या व डी पी.डी.सी. सदस्या कल्पनाताई तिजारे, डी पी.डी.सी. सदस्य युनुस शेख, काँँग्रेस पक्षाचे महासचीव सुनिल चडगुलवार, पंकज खोबे उपस्थित होते.