तेलंगणा सरकारने केलेला सिरोंचा तालुक्यातील मेडीगट्टा धरण जिल्ह्यासाठी पांढरा हत्ती

169

– राज्य सरकारने रमेशगुडम पेंटीपाका, झिंगानुर येथे उपसा सिंचन प्रकल्प करावा : आ. डॉ. देेेवराव होळी

विदर्भ क्रांंती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी पुष्कर मेळा निमित्याने या भागातील वन विभागाच्या जाचक कारवाईमुळे धास्तावलेल्या सिरोंचा येथील शेतकरी शेतमजूर कामगार यांच्या विनंती वरून पुष्कर मेळा आटोपून मेडीगट्टा धरण येथे सदिच्छा भेट दिली व येथील प्रमुख अभियंत विश्वकर्मालू व तिरुपतीराव उपअभियंता रवी जलसा यांच्या सोबत सविस्तर चर्चा केली व माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्या माहितीनुसार मेडीगट्टा धरणावर 85 गेट आहेत. या प्रकल्पामुळे तेलंगणा राज्य आज सुजलाम, सुफलाम होण्याच्या मार्गावर आहे. तेलंगणा राज्य येथील शेतकरी यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक उन्नती करीत आहे व येथील शेतकरी दुबार तिबार पीक घेत आहेत. तेथील शेतकरी बारमाही भाजीपाला उत्पादन घेतात..तेथील हजारो हेक्टर जमीन ओलितखाली आली आहे. सिरोंचा तालुक्यातील शेतकरी मेहनती आहे. सिंचन प्रकल्प नसताना देखील स्वखर्चाने येथील शेतकरी दुबार, तिबार पीक घेत आहेत व सिरोंचा तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी हा प्रकल्प पूर्णपणे पांढरा हत्ती ठरला आहे. याबद्दल आ. डॉ. होळी यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी सांगितले, या प्रकल्पावर तत्काळ.उपसा सिंचन योजना कार्यान्वित करणे गरजेचे आहे व लवकरच आपण स्वतः विधानसभेत येथील प्रश्न मांडणार आहे व स्वतः जलसंपदा मंत्री महोदय यांची भेट घेऊन त्यांना येथील समस्या बाबत मंत्रालय मुंबई येथे अवगत करणार व प्रामुख्याने सिरोंचा तालुक्यातील रमेशगुडम , पेंटिंपाका व झिंगाणुर येथे उपसा जलसिंचन प्रकल्प करण्यात यावा, अशी मागणी केली व गडचिरोली जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प करिता जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विराट आंदोलनाची गरज आहे, असे मत व्यक्त केले व लवकरच गडचिरोली जिल्ह्यातील प्रलंबित जलसिंचन व रेगुंठा उपसा जलसिंचन व इतर प्रकल्प इतर प्रकल्प आढावा बैठक घेणार, असे प्रतिपादन आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी कृषी सभापती प्रा. रमेश बारसागडे, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते दामोदर अर्गेलीवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सतीश गंजीवार, युवा नेते संदीप राचर्लावार, शारिख भाई शेख, भाजपा गडचिरोली विधानसभा सोशल मीडिया संयोजक रमेश अधिकारी व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.