भाजपाने पु. बाबासाहेबांच्या कार्याचा सन्मान केला : खा. अशोकजी नेते

64

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : 
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब यांच्या कार्याचा गौरव करत मा. नरेंद्रजी मोदी यांच्या नेत्रुत्वातील भाजपा सरकारने मुंबई येथे स्मारक, महु येथे स्मारक, दिल्ली येथे स्मारक, इंग्लड येथील घर घेऊन तथा 1990 ला भाजपा व्ही. पी. सिंंग सरकारने डाॅ. बाबासाहेब याना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले. महामानव, भारतरत्न पु. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करू या, अस मत खा. अशोकजी नेते, राष्ट्रीय महामंत्री भाजपा जनजाती मोर्चा यांंनी व्यक्त केले.
धानोरा येथे डाॅ  बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी आरोग्य शिबिराचे आयोजन करून 1500 लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली व शुगर चेक मशीन देण्यात आली.

भारतीय संविधानामध्ये 340, 341, 342 कलम टाकून देशातील ओबिसी, एस. सी. एस. टी. या 80 % मागासवर्गीयांंना विकास करण्याची संधी उपलब्ध करून देनारे संविधान निर्माते पु. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महान समाज सुधारक होते, अस मत प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणीस, भाजपा एस. टि. मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांंनी व्यक्त केले.
हिंद कोडबिल व संविधानाचे माध्यमातून डाॅ. बाबासाहेबांंनी महिलाना सन्मानाने आपला विकास करण्याची संधी उपलब्ध करून दिली, अस मत रेखाताई डोळस प्रदेश सदस्य भाजपा महिला आघाडी महाराष्ट्र यानी व्यक्त केले.
मंचावर रमेशजी भुरसे, प्रदेश सदस्य, किसान आघाडी महाराष्ट्र, जिल्हा अध्यक्ष साईनाथजी साळवे, लताताई पुंगाटे, उपनगराध्यक्ष बाडूभाऊ उंदिरवाडे, ताराबाई कोटागंले, सोपानजी म्हशाखेत्री, विजयजी कुमरे, दिल्ली येथील नया सवेरा आरोग्य संस्थेचे पदाधिकारी, गावकरी उपस्थित होते.