शिवसेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत करणार : खा. राहूल शेवाळे

100

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर शिवसेनेचा भर आहे. या बांधणीकरिता नियुक्ती अभिमान राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विविध समस्या जाणून घेण्यासोबतच पक्ष बांधणीसाठी शिवसेनेच्या वतीने सर्व जिल्ह्यात शिसंपर्क अभियान राबविण्यात येत असल्याचे खा. राहूल शेवाळे यांनी सांगितले. शिवसंपर्क अभियानानिमित्त जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता येेेथील सर्कीट हाऊसमध्ये पत्रकारांशी वार्तालाप करताना बोलत होते.

पक्ष बांधणीसाठी शिवसेनेच्या सर्व जिल्ह्यात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत मागील तीन दिवस जिल्ह्याचा दौरा केला. जिल्ह्यात कोरोना स्थितीमुळे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होऊ शकल्या नाहीत. महिला पदाधिकाऱ्यांची देखील पदे रिक्त आहेत. परिणामी कार्यकर्ते व पक्ष संघटन यांच्यात दरी निर्माण झाली होती. ती दुरी कमी करण्यासाठी पक्ष संघटनात्मक बांधणीवर भर दिला जाणार आहे. त्याकरिता लवकरच नियुक्ती अभियान राबविण्यात येणार असल्याचे खा. शेवाळे यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्याचे मागसलेपण दूर करीत जिल्हा विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात विविध विकासात्मक कामे केली जात आहेत. आर. आर. पाटलांच्या कार्यकाळानंतर ना. शिंदे यांच्या कार्यकाळात जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर निधी मिळत आहे. वनकायद्याच्या अडचणीमुळे अनेक कामे अडली आहेत. हा अडसर दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे खा. शेवाळे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

पत्रकार परिषदेला शिवसेना नेते सुधीर मोरे, जिल्हा प्रमुख वासुदेव शेडमाके, सहसंपर्क प्रमुख अरविंद कात्रटवार, विलास कोडाप, शहर प्रमुख रामकिरीत यादव, माजी नगराध्यक्षा अश्विनी यादव, नंदु कुमरे आदी उपस्थित होते.