गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

78

– पुणे येथील सोहळ्यात पुरस्काराचे वितरण

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य असोसिएशनचा राज्यस्तरीय उत्कृष्ट जिल्हा परिषद अध्यक्ष पुरस्काराने आदिवासी विद्यार्थी संघाचे विदर्भ सल्लागार तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांना ७ मार्च रोजी सन्मानित करण्यात आले. पुणे येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिलजी पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
अध्यक्ष पदाच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात विविध विषयांवर सभागृहात सर्वांना सोबत घेवुन केलेले नियोजन व त्याची उकल, केलेली विकासकामे, सामाजिक उपक्रम या सर्व बाबी विचारात घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

असोसिएशनतर्फे पुणे येथे ७ मार्च रोजी पहिल्या पुरस्कार वितरण सोहळ्याला केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कैलास गोरे पाटील व पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आले.

सदर पुरस्कार महाराष्ट्रातून ३६ जिल्ह्यातून अतिमागास व नक्षलग्रस्त ग्रामीण भाग असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष यांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात आले. अजय कंकडालवार हे आलापल्ली-वेलगुर क्षेत्रातून आदिवासी विद्यार्थी संघ (अपक्ष) म्हणून निवडून आले व जिल्हा परिषद उपाध्यक्ष बनले. त्यानंतर अडीच वर्षांनी अध्यक्ष बनले व जिल्हाच्या समस्याच्या निराकरण करत अहेरी विधानसभा क्षेत्रात अहेरी, मुलचेरा, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा या तालुक्यांत आरोग्य, शिक्षण, विज, रस्ते यांच्यावर भर देत जास्तीत जास्त निधी उपलब्ध करत आहे. विकासकामे करत प्रत्येक सामाजिक कार्यक्रमाला सहभाग दर्शवित सामाजिक बांधिलकी ठेवत आहेत त्याचेच हे फलित आहे.

आदिवासी विद्यार्थी संघाचे विदर्भ नेते माजी आमदार दीपकदादा आत्राम यांच्या मार्गदर्शनात अहेरी विधानसभेत जिल्हा परिषदेचे ७ सदस्य, पंचायत समितीचे २८ सदस्य निवडून आणत अहेरी पंचायत समितीमध्ये एकहात्ती सत्ता स्थापन केले तर जास्तीत जास्त ग्रामपंचायतमध्ये सरपंच, उपसरपंच व सदस्य जास्त असून सर्वांच्या सहकार्याने विकास कामे करताना सोईचे झाले असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. या वितरण सोहळ्याला भारत सरकारचे पंचायतराज मंत्री कपिल पाटील व असोसिएशनचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. गोरे पाटील व महराष्ट्रातील जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या उपस्थितीत पार पाडले.