गडचिरोली पोलीस दल आयोजित पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून पार पडले पहिले ‘भव्य गडचिरोली महोत्सव’ उत्साहात

211

– विजेत्या संघाचा मान्यवरांकडून सत्कार

– व्हॉलीबाल स्पर्धेत सिरोंचा तर रेला स्पर्धेत झिंगानुरच्या संघाने पटकाविले प्रथम क्रमांकाचे बक्षीस

– बचतगट व स्वयंसहायत गटांना मिळाली भव्य बाजारपेठ, विविध स्टॉलमधून 14 लाखांच्यावर वस्तुंची विक्री

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमाातून गडचिरोली जिल्हयात पहील्यांदाच ‘भव्य गडचिरोली महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले. हा महोत्सव जिल्हा परिषद कार्यालयाच्या भव्य मैदानावर  01/03/2022 ते 02/03/2022 दरम्यान पार पडला. या महोत्सवाचा समारोपीय व बक्षीस वितरण कार्यक्रम 02/03/2022 रोजी पार पडला.
गडचिरोली पोलीस दलाने आयोजित केलेल्या व दोन दिवसापासून चाललेल्या या गडचिरोली महोत्सवाचे विशेष आकर्षण बिरसा मुंडा व्हॉलीबॉल स्पर्धा व आदिवासी रेला समुह नृत्य स्पर्धा तसेच हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी 01/03/2022 रोजी महोत्सवाचे उद्घाटन ना. एकनाथजी शिंदे, नगर विकास व सार्वजनिक बांधकाम (सार्व. उपक्रम) तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा यांचे हस्ते, पोलीस उपमहानिरीक्षक संदिप पाटील, गडचिरोली परिक्षेत्र नागपूर यांचे उपस्थितीत पार पडले. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गडचिरोली जिल्हयाच्या दुर्गम व अतिदुर्गम भागातील व्हॉलीबालचे 10 संघ उपस्थित होते. या संघांमध्ये अत्यंत रोमहर्षक सामने पहावयास मिळाले. या व्हॉलीबॉल स्पर्धेमधून 03 विजेत्या संघांची निवड करण्यात आली. प्रथम क्रमांक विजेते असरअल्ली व्हॉलीबॉल सिरोंचा या संघास 25,000/-रु. रोख, ट्राफी व गोल्ड मेडल, व्दितिय क्रमांकाचे विजेते आरडी क्लब अहेरी यांना 20,000/-रु. रोख, ट्राफी, सिल्व्हर मेडल, व तृतिय क्रमांकाचे विजेते जय बजरंग क्लब एटापल्ली यांना 15,000/- रु. रोख, ट्राफी व ब्रााँझ मेडल देवुन सन्मानित करण्यात आले. तसेच या स्पर्धेत उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणुन कामगिरी करणा­या तरुण राघवसु गावडे, उत्कृष्ट स्मॅशर म्हणुन अंजी कनयक्का पेद्दी व उत्कृष्ट लिफटर म्हणुन निसार शेख यांना चषक, ट्रॅकस्ुट व प्रमाणपत्र देवुन सन्मानित करण्यात आले. तसेच महोत्सवाच्या दुस­या दिवशी दिनांक 02/03/2022 रोजी आदिवासी रेला समुह नृत्य स्पर्धा पार पडल्या. त्यातुन आदिवासी बांधवांच्या संस्कृतीचे दर्शन उपस्थितांना पहावयास मिळाले. या रेला नृत्य स्पर्धेत जिल्ह्यातून 10 संघ सहभागी झाले होते. त्यापैकी उत्कृष्ट पहील्या तीन विजेत्यांची निवड करण्यात आली. प्रथम विजेत्या जय सेवा रेला संघ झिगानूर यास 25,000/रु. रोख, ट्राफी व प्रमाणपत्र, व्दितीय क्रमांकाच्या अनुप डॉन्स रेला संघ घोट यास 20,000/रु. रोख, ट्राफी व प्रमाणपत्र, आदिवासी रेला नृत्य संघ धानोरा यास 15,000/रु. रोख, ट्राफी व प्रमाणपत्र व इतर सहभागी संघांना उत्तेजनार्थ प्रत्येकी 5000/- रोख देवुन गौरविण्यात आले. गडचिरोली जिल्ह्राच्या अतिदुर्गम भागातुन आलेल्या आदिवासी पारंपारिक रेला नृत्यासोबतच राजमुद्रा ग्रुपच्या कलावंतानी विविध नृत्य सादर करुन प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले.
महोत्सवातील दोन्ही दिवस गडचिरोली जिल्ह्यातील विविध 50 बचतगट व संस्थांनी आपल्या उत्पादनाचे व विविध वस्तुंचे स्टॉल लावलेले होते. यामध्ये नवजीवन उत्पादक संघ, नवेगाव गडचिरोली, कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली, एम्स अकॅडमी बुक स्टॉल गडचिरोली सोबतच मौजा किटाळी, वासाळा, पुराडा, कोटमी, भामरागड, अहेरी येथुन बांबु, माती व लाकडापासून निर्मीत हस्तकलेच्या वस्तु, ऑर्गनिक उत्पादने तांदुळ, हळद, पालेभाज्या, अंबाडी सरबत, मोहफुलापासुन तयार केलेले लाडु बिस्किट, जॉम, मस्य लोणचे, जांभुळ निर्मीत विविध उत्पादने तसेच इतर वस्तु विक्रीकरीता लावण्यात आले होते. बचत गट व स्वयंसहायता गटांच्या विविध हस्तकलेच्या वस्तुंच्या स्टॉलमधुन 14 लाखांंच्यावर उपस्थित नागरिकांनी खरेदी केली. या महोत्सवाच्या माध्यमातुन बचत गट व संस्थांना मोठी बाजारपेठ मिळाली.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण व समारोपीय कार्यक्रम पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी गडचिरोली कुमार आशिर्वाद, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) अनुज तारे, पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोलाचे अधिष्ठाता कडू, उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड गणापुरे, कृषी विज्ञान केंद्र (आत्मा) गडचिरोली संदिप क­हाडे यांचे हस्ते पार पडले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार व अंमलदार यांनी परिश्रम घेतले.