सांघिक भावनेतून खेळाचे प्रदर्शन करावे : महेंद्र ब्राम्हणवाडे

68

– विहिरगाव येथे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या हस्ते कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : कबड्डी हा आपल्या मातीशी जुळलेला खेळ असून संघ भावनेतून खेळाळूंनी कबड्डी हा खेळ खेळावा. या माध्यमातून येणाऱ्या काळात देशाला उत्तम दर्जाचे खेळाडू मिळतील, असा विश्वास जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी व्यक्त केले.
विहिरगाव येथील भव्य डे – नाईट खुल्या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी प्रदेश काँग्रेसचे महासचिव तथा जिल्हा निरीक्षक डॉ. नामदेवराव किरसान, उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, काँग्रेस जेष्ठ नेते हरबाजी मोरे, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिवाकर निसार, ढिवरू मेश्राम, भगवानदास नवघडे, सरपंच श्रीमती तलांडे, उपसरपंच अनिल कोठारे, ग्रा. पं. सदस्य मानकर, चिटलवार, श्रीनिवास ताडपलीवार, मुख्याध्यापक देवतळे आदी मान्यवर, गावकरी, कबड्डी प्रेमी व मोठ्या संख्येने खेळाडू यावेळी उपस्थित होते.