शहीद वीर गुंडाधूर धुर्व यांचे अनमोल विचार आचरणात आणणे गरजेचे : माजी आमदार दीपकदादा आत्राम

72

– येरमनार येथे शहीद गुंडाधूर दुर्व यांची ११२ वा स्मृतीदिन साजरा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गोंडवाना राज्य बस्तर क्षेत्राचे भूमकाल आंदोलन १९१० च्या महान क्रांतिकारी शहिद गुंडाधूर दुर्व यांचा ११२ वा शहीद स्मृती दिवस कार्यक्रम अहेरी तालुक्यातील पारंपारिक पेरमिली इलाका पट्टी यांच्यातर्फे अतिदुर्गम येरमनार गावात घेण्यात आला.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून समाज बांधवांंना मार्गदर्शन करताना अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार दीपकदादा आत्राम म्हणाले, शहीद गुंडाधूर दुर्व यांचा जन्म तेव्हाची बस्तर आताची छत्तीसगढ़ येथील नेतानार येते झाला असुन क्रांतिकारी शहीद गुंडाधूर दुर्व यांनी बस्तरच्या इंग्रजांची भांडवलशाही नष्ट होऊन जल, जंगल, जमिनीवर मालकी हक्क जनतेचा असला पाहिजे यासाठी त्यांनी जनसंघर्ष उभा केला. यासाठी त्यांंनी गावागावातील युवकांना संघटीत करून त्यांची टोळी तयार केली व “डारा मिरी” चा उद्देश्य घेवून सम्पूर्ण बस्तरमध्ये नियोजन केले. डारा मिरी अर्थात लाल मिर्ची व आंब्याचा फंदा घेवून बस्तरमधील प्रत्येक गावात जनआंदोलन उभे केले व प्रशिक्षण देऊन येथील शोषण आणि अत्याचाराच्या विरोध करत ब्रिटिश सरकारच्या वन नीती, अनिवार्य शिक्षा, धर्म परिवर्तन, बेगारी प्रथा, नौकरशाही यांच्या विरोधामध्ये भूमकाल विद्रोह आंदोलन उभे केले व विजय झाले होते. अश्या या आदिवासी क्रान्तिकाराचे नाव या देशाच्या इतिहासाच्या पानातून गायब झाला आहे. म्हणून क्रांतिकारी शहीद गुंडाधूर दुर्व त्यांच्या क्रांतीला मान, सम्मान व न्याय देण्यासाठी त्यांच्या क्रांतिकारी विचारांना स्मरण करण्यासाठी जल, जंगल, जमीन व आदिवासींच्या भाषा, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी, अन्याय, अत्याचार व शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी क्रांतिकारी शहीद गुंडाधूर दुर्व यांचे अनमोल विचार त्यांंनी केलेली इंग्रज विरुध्द भूमकाल उठाव यांच्या समाज बांधवांंनी आचरणात आणले पाहिजे. तेव्हाच कुटुंबाच्या व समाजाच्या विकास होईल असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन आत्राम, येरमनारचे सरपंच संध्या मडावी, पेरमिलीचे सरपंच किरणताई कोरेत, कुरूमपलीचे सरपंच मुत्ता मडावी, दामरंचा सरपंचा किरणताई कोडापे, मेडपली सरपंच निलेश वेलादी, येरमनारचे उपसरपंच विजय आत्राम, माजी सरपंच बालाजी गावडे, कमलापूरचे माजी सरपंच सांबया करपेत, आल्लापलीचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्रा. पं. सदस्य विजय कुसनाके, कमलापूरचे माजी उपसरपंच शंकर आत्राम, माजी ग्रा. पंं. सदस्य कैलाश कोरेत यांनी पण उपस्थित समाज बांधवांना आर्थिक, शैक्षणिक व समाजाबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाची सुरुवात गोंगो पूजा करून गाव गायता डोलु मडावी व गाव भूमिया वारलू मडावी यांच्या हस्ते सप्तरंगी ध्वजाचा ध्वजारोहन करून करण्यात आली.
कार्यक्रमााचे संचालन वासुदेव कोडापे तर प्रस्ताविक बालाजी गावडे यांनी केलेे. आभार प्रदर्शन तिरू. सूरज आत्राम यांनी केली. यावेळी पारंपारिक इलाका पट्टी पेरमिलीचे बहुसंख्य महिला, पुरुष, युवक, युवती उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी येरमनार येथील नागरिकांनी परिश्रम घेतले.