गडचिरोली येथील आठवडी बाजार दुकान गाळे बांधकामाचा लोकार्पण सोहळा उद्या

124

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली नगर परिषद अंतर्गत आठवडी बाजार दुकान गाळे बांधकामाचा लोकार्पण सोहळा गुरुवार, 13 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला उद्घाटक म्हणून राज्याचे नगरविकास मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथजी शिंदे, सहउद्घाटक म्हणून गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी, वर्धा- चंद्रपूर- गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार रामदासजी आंबटकर तर अध्यक्ष म्हणून गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष योगिताताई प्रमोद पिपरे, विशेष अतिथी म्हणून न. प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, न. प. बांधकाम सभापती प्रवीण वाघरे, पाणी पुरवठा सभापती मुक्तेश्वर काटवे, शिक्षण सभापती वर्षा अरविंद नैताम, नगरसेविका वैष्णवी विलास नैताम, सर्व नगरसेवक, नगरसेविका आदी मान्यवर लाभणार आहेत. सदर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन गडचिरोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ, न. प. अभियंता गिरीषकुमार मैंद व नगर परिषद कर्मचाऱ्यांनी केले आहे.