– शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना 24 तास वीजपुरवठा करण्याची केली मागणी
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना 24 तास वीजपुरवठा मिळावा याकरिता आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांनी शेतकऱ्यांचा हितााकरिता वडसा – आरमोरी मुख्य रोडवर उपकार्यकारी अभियंता विद्युत वितरण विभाग वडसा या ठिकाणी चक्काजाम आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या व्यथा महावितरण कंपनीला सागून थकले आहेत. पण महाविकास आघाडी सरकारनेे जाणून बुजून शेतकर्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने आज आमदार कृष्णाजी गजबे यांच्या नेतृत्वात कृषीपंपांना 24 तास वीजपुरवठा मिळावा याकरिता भर पावसात आमदार कृष्णाजी गजबे यांच्या नेतृत्वात हजारो शेतकरी बांधव रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन केले. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना 24 तास विद्युत पुरवठा मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, असा इशारा आमदार गजबे व शेतकरी बांधवांनी महावितरण कंपनीला दिला आहे.