– वंदनिय शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदतकक्ष व मा. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फॉऊंडेशनचा उपक्रम
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : काल ३१ डिसेंबर २०२१ रोजी शिवसेनेच्या सामाजिक उपक्रमांतर्गत वंदनिय शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि मा. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फॉऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली तालुक्यातील अमिर्झा – मुरमाडी जि. प. क्षेत्रातील मौजा बेलगाव येथे आरोग्याचा महायज्ञ या उपक्रमांतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . शिबिराचा शेकडो गोरगरीब नागरीकांनी लाभ घेतला. शिबिराचे उद्धघाटन श्री. मंगेश चिवटे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्यप्रमुख यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा नियोजन समिती सदस्य श्री. अरविंदभाऊ कात्रटवार होते. या शिबिराच्या उद्धघाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना श्री. मंगेश चिवटे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्यप्रमुख म्हणाले, जनतेच्या आरोग्याचे हित लक्षात घेता शिवसेनेच्या वतीने आरोग्य विषयक उपक्रम राबविण्यात येते. वंदनिय शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फॉऊंडेशनच्या वतीने राज्यात आरोग्य महायज्ञ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून गडचिरोली जिल्ह्यात सुध्दा आरोग्य महायज्ञाच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शिवसेनेने आरोग्य सेवेची संधी उपलब्ध करुन दिली आहे. आरोग्य तपासणीसाठी गोरगरीब नागरीकांना वेळ व पैसा खर्च करावा लागतो हे लक्षात घेऊन गावातच त्यांना आरोग्य तपासणीची सोय उपलब्ध करुन दिलेली आहे. यानंतर मार्गदर्शन करताना शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा नियोजन समिती सदस्य श्री. अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले, गडचिरोली जिल्ह्याचा विकासाचा दृष्टीकोन समोर ठेऊन पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. जिल्ह्यातील तोकडी आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी पाऊल उचललेले आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे गडचिरोली जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले आहे..यामुळे गोरगरीब रुग्णांंना आपल्या जिल्ह्यातच दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या पुढाकारामुळेच जिल्ह्यात प्रथमच वंदनिय शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फॉऊंडेशनच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य शिबीर राबवून जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. आरोग्यम् धनसंपदा हे ब्रीद वाक्य जोपासून शिवसेनेच्या वतीने गोरगरीबांना आरोग्याची नवसंजीवनी उपलब्ध करुन देण्यात आली आहे . या आरोग्य शिबिराप्रसंगी श्री. मंगेश चिवटे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्यप्रमुख, शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा नियोजन समिती सदस्य श्री.अरविंदभाऊ कात्रटवार, श्री. सुरेंद्रसिंह चंदेल जिल्हाप्रमुख शिवसेना, विलास कोडाप शिवसेना सहसंपर्क प्रमुख, वासुदेव सेडमाके शिवसेना जिल्हाप्रमुख, छायाताई कुंभारे माजी महिला संघटिका जिल्हा गडचिरोली, ज्ञानेश्वर बगमारे शिक्षकसेना जिल्हाप्रमुख, वैद्यकीय मदत कक्षातील जितेंद्र सातव संपर्क समन्वयक, स्वरुप काकडे, ऋषीकेश देशमुख, सागर झाडे, नितीन हिलाल, गजानन नार्लावार, राजाभाऊ भिल्लोर, ज्ञानेश्वर कानडे, नुतन कुंभारे, यादवजी लोहंबरे शिवसेना उपतालुका प्रमुख, संदिप भुरसे, भक्तदास कोठारे, बंडूजी लटारे, जगदिश कुनघाडकर, परशुराम कोठारे, रुनूजी भांडेकर, शंकर जुवारे, रोषन धोडरे, अरविंद भांडेकर, बापूजी वासेकर, स्वप्नील धोडरे, नाजुक शेडमाके, अमृत वासेकर, पुंडलिक कोठारे, रवि नैताम, वाल्मिक भांडेकर, तुळशिराम जुमनाके, निकेश लोहंबरे, स्वप्नील खांडरे, अरुण बारापात्रे, राजु जुवारे यांच्यासह परिसरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.