चामोर्शी येथील राष्ट्रीय महामार्गावरील हायमास्ट पथदिवे तत्काळ सुरू करा

40

– नगरसेवक आशीष पिपरे यांचे खा. अशोक नेते यांना निवेदन सादर

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, 26 जून 2023 : चामोर्शी येथील राष्ट्रीय महामार्गावरील सिमेंट काँक्रिट रोड व नाली बांधकाम पूर्ण होऊन अनेक महिने लोटले आहेत. तसेच रोड डीवायडरवरील मोठ्या विद्युत खांबावरील हायमास्ट अजूनपर्यंत सुरू झाले नाहीत. त्यामुळे चामोर्शी शहरातील राष्ट्रीय महामार्गावर रात्री अंधाराचे साम्राज्य पसरले राहते. त्यामुळे शहराचे सौंदर्य भकास झाले आहे व अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आष्टी – मुल मार्गावरील लक्ष्मी गेट चौकात हायमास्ट लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, अशी मागणी चामोर्शी नगरपंचायतचे नगरसेवक आशीष पिपरे व रमेश अधिकारी यांनी गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्याकडे निवेदनाव्दारे केली. यावेळी खासदार अशोक नेते यांनी भ्रमणध्वनीव्दारे नॅशनल हाईवेचे वरिष्ठ अभियंता व अधिकारी यांना चामोर्शी शहरातील हायमाष्ट लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश दिले. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी हायमाष्ट सुरु करण्याचे आश्वासन दिले.