Home गडचिरोली अंमली पदार्थ विरोधीदिनी 5 गुन्ह्यांतील जप्त गांजा केला नष्ट

अंमली पदार्थ विरोधीदिनी 5 गुन्ह्यांतील जप्त गांजा केला नष्ट

124

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, 26 जून 2023 : अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून आज 26 जून रोजी पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या अंमली पदार्थ नाश समितीने गडचिरोली घटका अंतर्गत येणाऱ्या 4 पोलीस स्टेशनमधील अंमली पदार्थासंदर्भात दाखल असलेल्या 5 गुन्ह्यांतील जप्त मुद्देमाल शासनाने निर्गमीत केलेल्या व सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांनी निर्देशाप्रमाणे कार्यवाही करुन जाळुन नष्ट करण्यात आला.
सदर कारवाई दरम्यान पोस्टे कुरखेडा येथील 2 गुन्हे, पोस्टे पुराडा, गडचिरोली, धानोरा येथील प्रत्येकी 1 अशा एकुण 5 गुन्ह्रातील एकुण 90.718 कि.ग्रॅ. गांजा (अंमली पदार्थ) जाळुन नाश करण्यात आला. सदर प्रक्रिया ही समितीचे अध्यक्ष  पोलीस अधीक्षक नीलोत्पल, कमेटी मधील सदस्य अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, प्र. पोलीस उपअधिक्षक (मुख्या.) प्रमोद बानबले, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा उल्हास पी. भुसारी, न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा नागपुर येथील सहा. रासायनिक विश्लेषक, केशव शामराव कापगते, वजन मापे विभागाचे प्रतिनीधी रुपचंद निंबाजी फुलझेले निरीक्षक, जिल्हा परिषद गडचिरोली येथील पंच संदिप आष्टीकर, प्रदिप पाटील यांचे उपस्थितीत करण्यात आली.
सदर कार्यवाही करीता स्थानिक गुन्हे शाखा, पोउपनि दिपक कुंभारे, पोहवा/नरेश सहारे, पोना/राकेश सोनटक्के, पोना/शुक्रचारी गवई, पोना/दिपक लेनगुरे, पोशि/माणिक दुधबळे, पोशि/सचिन घुबडे, पोशि/मंगेश राऊत, चापोना/माणिक निसार, चापोना/मनोहर टोगरवार, फोटोग्रॉफर देवेंद्र पिद्दुरकर, पंकज भगत यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!