श्री लक्ष्मी नारायण मंदिरात रामनवमी उत्साहात साजरी

33

– माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे व माजी नगरसेवक प्रमोदजी पिपरे यांची उपस्थिती

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : श्रीराम उत्सव समिती व स्वामी श्री लक्ष्मी नारायण मंदिर समिती,सर्वोदय वार्ड गडचिरोलीच्या वतीने रामनवमी निमित्य प्रभू श्रीराम यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष सौ  योगीताताई पिपरे व माजी नगरसेवक प्रमोदजी पिपरे यांनी स्वामी लक्ष्मी नारायण मंदिरात जाऊन दर्शन घेतले. व पूजा केली. यावेळी ऍड प्रशांत आखाडे, अनुप कत्रोजवार व वार्डातील प्रतिष्ठित नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी वार्डातून श्रीरामाच्या झाकीची भव्य मिरवणूक काढण्यात आली व भाविकांच्या मनोरंजनासाठी गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . यावेळी माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी भाविकांना मार्गदर्शन करून त्यांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.