भाजपा – शिवसेनेतर्फे राज्यव्यापी सावरकर गौरव यात्रा

36

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात ३० मार्चपासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेतर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा 6 एप्रिलपर्यंत चालणार असूून गडचिरोली जिल्ह्यात

यात्रेचे नेतृत्व भाजपा जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, आमदार कृष्णाजी गजबे, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे व इतर पदाधिकारी करणार असल्याची माहिती आमदार डॉ. देवराव होळी यांनी येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
नव्या पीडित स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अवमान केला जात आहे. राहुल गांधी व काँग्रेसच्या अन्य नेत्यांकडून सावरकरांचा वारंवार अवमान केला जात आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस बरोबरची युती उद्धव ठाकरे यांनी तोडून दाखवावी, असे आव्हान या माध्यमातून देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघातून सावरकर गौरव यात्रा प्रवास करेल. ६ एप्रिलला भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनी या यात्रेचा समारोप होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजपा – शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी या यात्रेत सहभागी होणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार होणार अपमान सत्ता टिकवण्यासाठी निमूटपणे सहन केला. सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा विचार सोडून दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिमेला रस्त्यावर उतरून जोडे मारले होते. तशी हिंमत उद्धव ठाकरेंनी दाखवायला हवी होती. या यात्रेसाठी प्रदेश संयोजक म्हणून प्रदेश महायंत्री विक्रांत पाटील, मुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगरसेवक प्रमोद पिपरे, शिवसेना नेते हेमंत जंबेवार, भाजपा शहर महामंत्री मुक्तेश्वर काटवे, शहर महामंत्री केशव निंबोड, तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे आदींची उपस्थिती होती.