सिनेअभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या हस्ते ‘बी – फॅशन प्लाझा फॅमिली शाॅपींग माॅल’चे थाटात उद्घाटन

50

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : शहरातील मूल रोडवर नव्याने उभारलेल्या एकमेव ‘बी – फॅशन प्लाझा’ फॅमिली शाॅपींग माॅलचा शुभारंभ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर 22 मार्च रोजी प्रसिद्ध सिनेअभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या हस्ते मोठ्या थाटात करण्यात आला.
मागील तीन दशकांपासून ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले ‘बी- फॅशन प्लाझा’ हे गडचिरोली शहरातील प्रतिष्ठीत कापड दुकान आहे. या दुकानात विविध व आकर्षक फॅन्सी कपडे मापक दरात ग्राहकांना उपलब्ध होत असल्याने ग्राहकांची पसंती वाढली आहे. या दुकानाने आणखी एक पाऊल पुढे टाकत ‘बी- फॅशन प्लाझा फॅमिली शाॅपींग माॅल’ गडचिरोली शहरातील मूल मार्गावर सुरू केला आहे. या माॅलमध्ये विविध व आकर्षक फॅन्सी कपड्यांसह फुटवेअर व काॅस्मेटीक वस्तू ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या शाॅपींग माॅलचे सिनेअभिनेत्री किशोरी शहाणे यांनी कौतुक केले आहे.
या शाॅपींग माॅलच्या उद्घाटनप्रसंगी माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रवी चन्नावार, सचिव गुरुदेव हरडे, सदस्य दिलीप सारडा आदींसह व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली. यावेळी बी फॅशन प्लाझाचे संचालक मनोज देवकुले, शैलेश देवकुले, सुरेश देवकुले, विजय देवकुले, हिमांशु देवकुले, डॉ. राज देवकुले, ज्योती देवकुले, पुष्पलता देवकुले, कविता देवकुले व परिवारातील सदस्य उपस्थित होते.