गडचिरोली जिल्हा जैन कलार समाज न्यासची बिनविरोध निवडणूक

132

– जिल्हाध्यक्ष रतन शेंडे तर सचिव पांडुरंग पेशने

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जैन कलार समाज न्यास गडचिरोली जिल्हा कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी बिनविरोध निवडून आले. अध्यक्षस्थानी रतन शेंडे यांची तर सचिव म्हणून पांडुरंग पेशने यांची निवड करण्यात आली. सर्व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाल्याने जैन कलार
समाजाचा गडचिरोली जिल्हा निवडणुकीचा लाखो रुपयाचा खर्च वाचवून जिल्ह्यातील समाज बांधवांनी एक नवा आदर्श घालून दिला आहे. वाचलेल्या पैशातून समाजाच्या विकासाची कामे करण्याचा संकल्प जैन कलार समाज बांधवांनी एकमुखाने केल्यामुळे समाज स्तरावरून सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
उपाध्यक्ष म्हणून संदीप दहीकर, कोषाध्यक्ष अशोक हरडे, सहसचिव वैभव भिवापुुरे, कार्यकारणी सदस्य हेमंत डोर्लीकर, डॉ. उमेश समर्थ, मनोज बनपुरकर, महेश मुरकुटे, सुरेखा रणदिवे, अर्चना मानापुरे, विलास गोटेफोडे, वैशाली लाड, वर्षा शनिवारे, रवींद्र गोटेफोडे, प्रकाश समर्थ, वसंत भांडारकर, केवळराम किरणापुरे, पराग दडवे, गौरव नागपूरकर, अश्विन भांडारकर, वसंत फटिंग, गुलाब मानापुरे, रुपेश लाड, राजेंद्र घुगरे यांची निवड करण्यात आली.
जिल्हा कार्यकारिणी बिनविरोध निवडीकरिता भूषण समर्थ, विनोद शनिवारे, प्रदीप रणदिवे, मनोज कवठे, सुधीर शेंडे, किशोर भांडारकर, प्रदीप लाड, अल्केश शनिवारे, धनराज गुरु, वासुदेव लाड, दिलीप दडवे, गणेश हरडे, हिराजी बनपूरकर, स्वाती कवठे, लता मुरकुटे, भाग्यश्री शेंडे, अर्चना भांडारकर, सरिता पेशने, स्नेहा शेंडे, शारदा हजारे, मनिषा हरडे व जैन कलार समाज बांधवांनी मोलाचे सहकार्य केले.