वाघाच्या हल्ल्यात गाय ठार

161

– जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांना महिती मिळताच घटनास्थळी जाऊन पाहणी करुन वनविभागाला दिली माहिती

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली / २९ नोव्हेंबर २०२२ : अहेरी तालुक्यातील इंदाराम ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेले गेर्रा येथील रहिवासी नामे मल्ला देबूडू अर्का यांच्या गायीवर गावानजीकच शेतशिवरात रस्तावरच वाघाने (tigar) हल्ला केला. या हल्ल्यात गाय ठार झाली. ही घटना सकाळी उघडळीस आली असून संपुर्ण गावात भितीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार (ajay kankdalwar) यांना देताच घटनेस्थळी जावुन पाहणी करुन पंचनाम्यासाठी वन विभागाला (forest) माहिती दिली. अशा अनेक घटना घडतच असून या वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, असे वन विभाग कर्मचाऱ्यांना यावेळी सांगण्यात आले. यावेळी वनपाल शहारे, वनरक्षक कुमारे, तेजूभाऊ दुर्गे, प्रकाश पेंदाम, चिन्नु अर्का, जलपत अर्का, पांडु अर्का, गंगाराम तोर्रेम, अजय अर्का, साईनाथ अर्का, लक्ष्मण आत्राम, उपस्थित होते.