मौशीचक वासीयांना आता करावा नाही लागणार पाणीटंचाईचा सामना

61

– शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या प्रयत्नांमुळे मौशीखाब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील मौशीचक येथील पाणीपुरवठा योजनेचे काम सहा महिन्यातच पूर्ण

– आंदोलनाची जिल्हा परिषद प्रशासनाने घेतली दखल

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील मौशीचक गावातील नागरिकांना दरवर्षी उन्हाळयात पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. पाण्यासाठी महिलांना तर धावाधाव करावी लागत होती. गावातील पाण्याची समस्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्याकडे मौशीचक वासीयांनी मांडली. पाणीटंचाईच्या गंभीर समस्येकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्याासाठी अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेवर धडक देण्यात आली. या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने मौशीचक येथे पाणीपुरवठा योजना मंजूर करून तातडीने योजनेचे काम पूर्ण केले असून गावातील पाण्याची समस्या आता दूर झाली आहे. मौशीचक हे मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिषदेत क्षेत्रातील गाव असून या गावाची लोकसंख्या ४५० इतकी आहे. गावात पाणीपुरवठा योजना नव्हती. गावात केवळ एक हातपंप व एक विहीर आहे. यावरच गावकऱ्यांना आपली तहान भागवावी लागत होती. उन्हाळयात हातपंप आणि विहीरीच्या पाण्याची पातळी खोलवर जात असल्याने गावात भिषण पाणीटंचाईची समस्या उध्दभवत होती. गावातील पाणीटंचाईमुळे नागरिकांबरोबरच पाळीव जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. पाण्यासाठी महिला नागरिकांना पहाटेपासून धावाधाव करावा लागत होती. मौशीचक येथील पाणीटंचाईच्या प्रश्नाकडे कोणत्याही राजकीय पदाधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. लोकप्रतिनिधी समस्येकडे लक्ष देत नसल्याने गावकऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्याकडे धाव घेऊन गावातील पाण्याची समस्या मांडली. जनसेवेच्या कार्यासाठी सदैव तत्पर असलेले अरविंदभाऊ कात्रटवार यांनी मौशीचक येथील पाण्याची समस्या लक्षात घेऊन गावकऱ्यांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेवर धडक देत पाणीटंचाईच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तूरकर यांनी समस्येची गंभिरतेने दखल घेऊन मौशीचक येथे पाणीपुरवठा योजना मंजूर केली. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने योजनेचे काम सहा महिन्यातच पुर्ण करण्यात आले मौशीचक येथील पाणीपुरवठा योजना मंजूर करून गावातील नागरिकांची पाण्याची समस्या दूर केल्याबद्दल मौशीचक वासीयांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्याप्रती आभार व्यक्त केले आहे. अरविंदभाऊ कात्रटवार हे जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेले हिंदु हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक असून गावातील नागरिक सदैव त्यांच्या पाठीशी राहतील, अशी भावना मौशीचक वासीयांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी शिवसेना सह संपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यादवजी लोहबरे, राहुल सोरते, स्वप्निल खांडरे, निकेश लोहबरे, हिरालाल गावंडे, जानकी सलोटकर, पुंडलिक चिंचोलकर, रामदेव चिंचोलकर, रमाकांत चिंचोलकर, अन्तरराव मडावी, मुकरु कोहपरे, जगन सलोटकर, जगन्नाथ ठाकरे, रविन्द्र सयाम, रविंद सयाम, अश्विनी देशमुख, रामलता उइके, चन्दा बुरेवार, सुनंदा गावंडे, सरिता हुुलके, भूमिका चिंचोलकर, संजय उसेंडी, किशोर देशमुख, शशिकला ठाकरे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.