विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा जयजयकार करीत श्री. गणेशाला नतमस्तक होऊन व वंदन करीत खा. अशोकजी नेते यांनी विविध ठिकाणी भेट देऊन श्रीगणेेेशांंचे दर्शन घेतले.
मागील दोन वर्ष कोरोनाच्या काळात गेले. त्यामुळे गणपती बाप्पाचेे कार्यक्रम किंवा घरगुती किंवा सार्वजनिक ठिकाणी श्री. गणेशाची स्थापना करण्यात आलेली नव्हती. पण यावर्षी श्री. गणेशाचे उत्सव मोठ्या आनंदाने, उत्साहाने, श्रद्धेने, धार्मिकतेने भावनेने केल्या जात आहे. यासाठी या क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांनी गणपतीला वंदन करीत गणपतीच्या चरणी नतमस्तक होऊन जगात कोरोनाचे संकट टळो किंवा कोरोणाचे संकट जावे याकडे गणेशाला साकडे घातले. जनतेला सुख समृद्ध, आरोग्य, निरोगीमय जीवन मिळावे. तसेच बळीराजावर आलेले संकट हे सुद्धा दूर करावे यासाठी विविध ठिकाणी गणेश बाप्पाचे दर्शन घेऊन प्रार्थना केली.
सावली येथील भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते प्रकाशजी खजांजी तथा लोकसभा क्षेत्राचे सोशल मीडिया प्रमुख आनंदी खजांजी, सावलीच्या नगरसेविका तथा महिला आघाडीच्या नेत्या नीलमताई निखिलजी सुरमवार यांच्या घरी भेटीदरम्यान श्री. गणेशाचे दर्शन घेतले.
तसेच गडचिरोली येथे सुधाकरराव येनंगदलवार भाजपाचे ज्येष्ठ नेते, गजाननराव येनंगदलवार भाजपाचे ज्येष्ठ नेते, गीताताई कोडापे माजी सभापती, प्रकाशजी अर्जुनवार सामाजिक कार्यकर्ते, जिल्हा सचिव सौ. गीताताई हिंगे, संजयजी बारापात्रे जिल्हा उपाध्यक्ष, अरूणभाऊ हरडे, सामाजिक कार्यकर्ते, भारतजी खटी साहेब यांच्या घरी गणपती बाप्पा व महालक्ष्मीचे दर्शन घेतले.