विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : दिनांक ५ सप्टेंबर २०२२ रोज सोमवारला शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालय चामोर्शी येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. व्ही. धोटे होते. अध्यक्ष स्थानावरून प्राचार्य धोटे बोलताना म्हणाले की, शिक्षक हा समाजाच्या घडणीतील महत्त्वाचा आधारस्तंभ होऊन नेहमी ज्ञानरूपी ज्योत प्रज्वलित करीत असतो.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. काशेट्टीवार मॅडम, प्रा. डॉ. निखाडे, प्रा. झाडे, प्रा. सावसाकडे, प्रा.आंबोरकर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयातील विद्यार्थिनी काजल मडावी हिने केले तर प्रास्ताविक पायल गाजरलावर, मनोगत बिंदिया किरमे व आभार प्रदर्शन रुचिता खांडेकर हिनेे केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.