सावली येथील मक्केवार कुटुंबीयांचे खा. अशोकजी नेते यांनी आर्थिक मदत देऊन केले सांत्वन

68

विदर्भ क्रांती न्यूज

सावली : सावली येथील श्री. अंकुश मक्केवार यांची मुलगी काजल अंकुश मक्केवार वय १३ वर्ष वर्ग पाचवी मध्ये चांदाळा या ठिकाणी शिकत होती. सुट्टीच्या वेळी आपल्या स्वभावी आली असता असोलामेंढा या प्रकल्प नहराच्या पाटामध्ये पोहताना अचानक काजलचा भाऊ पाण्यात बुडाल्याने तिने भावाचा जीव वाचवण्यासाठी गेली असता पाण्याचा अंदाज न आल्याने तिचा बुडून अंत झाला. यामध्ये तिच्या भावंडासह पाच मुले होती. पण चार मुलांना वाचवण्यात यश आले. पण आपल्या भावाला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केले.*

याबाबतची माहिती मिळताच या क्षेत्राचे खा. अशोकजी नेते यांनी मृतकाच्या परिवारांची घरी जाऊन आर्थिक मदत देऊन परीवारांचे सांत्वन केले. तसेच मृतकाच्या कुटुंबीयांना शासनाकडून मिळणारी मदत तात्काळ मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी तातडीने  मदत देण्याचे निर्देश खा. अशोकजी नेते यांनी नायब तहसीलदार यांना सूचना केल्या. याप्रसंगी तालुकाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चाचे अविनाश पाल, महामंत्री तथा नगरसेवक सतीशजी बोमावार, शहराध्यक्ष आशिष कार्लेकर, ठाणेदार बोरकर, नायब तहसीलदार कांबडी,  प्रसाद जकुलवार, मयूर गुरनुले, अंकुश मक्केवार, मधुकर मेडपलीवार, संजय मेडपलीवार, पार्वताबाई मक्केवार शांताबाई तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.