गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेन्द्र ब्राम्हणवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

52

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : दि. १ सप्टेंबर २०२२ गडचिरोली जिल्हा कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष महेन्द्र ब्राम्हणवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा कॉंग्रेस कमिटी कार्यालय गडचिरोली येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. एन. डी. किरसान यांनी जिल्हाध्यक्ष महेन्द्र ब्राम्हणवाडे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.