– अरविंदभाऊ कात्रटवारांची धरणे आंदोलनात मागणी
– भ्रष्टाचारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यावर कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
– अभियंता सुरेश साखरवाडेंच्या भ्रष्टाचाराचा वाचला पाढा
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 चे भ्रष्टाचारी कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांना सेवेतून निलंबीत करण्यात यावे, तसेच त्यांची गडचिरोली जिल्ह्यातून हक्कालपट्टी करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी लोकनेते तथा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात आज, 9 जून 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. भ्रष्टाचारी कार्यकारी अभियंता साखरवाडे यांना पाठीशी न घालता त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी अरविंदभाऊ कात्रटवार यांनी शासन व प्रशासनाकडे केली.
अरविंदभाऊ कात्रटवार यांनी स्पष्ट केले की, कार्यकारी अभियंता साखरवाडे यांच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उजेडात आणून कारवाईची मागणी करण्यात आली आहे. 15 मे 2026 रोजी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्यामार्फत मुख्यमंत्री कार्यालयाला निवेदन देण्यात आले. 25 मे 2026 रोजी अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर डफरे बजाओ आंदोलन तसेच 3 जून 2026 रोजी कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर ‘प्रतिकात्मक प्रेतयात्रा आंदोलन करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. परंतू अद्यापही झोपी गेलेल्या शासकीय यंत्रणेला जाग आलेली नाही.

कोरची तालुक्यातील नाडेकल बेतकाठी मार्गावरील खोब्रागडी नदीवर अंदाजे 5 कोटी रूपये खर्चून बांधण्यात आलेला पुल रहदारी सुरू होण्यापुर्वी कोसळला. या पुल बांधकामाची पाहणी केली असता पुलाचे निकृष्ट काम करून मोठया प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला आहे. 2025 – 26 या आर्थिक वर्षात ग्रामीण भागातील रस्ते दुरूस्ती व पुल दुरूस्तीच्या 50 कोटीच्या कामात भ्रष्टाचार करण्यात आला असून कामे न करताच बिले काढण्यात आली आहे. तसेच मागील 3 वर्षात तब्बल 5 हजार कामांच्या निविदा नियबाहय रित्या काढण्यात आल्या असून सदर कामे कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांनी केवळ मजूर सहकारी सहकारी संस्थांना 20 टक्क्याने विकण्यात आल्याचा आरोपही कात्रटवार यांनी केला आहे.
कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांचे कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांशी चांगले वर्तन नाही. साखरवाडे हे कंत्राटदार व कार्यालयात उपस्थित असलेल्या इतर व्यक्तीसमोर महिला कर्मचाऱ्यांना दुहेरी ;लज्जास्पदद्ध शब्दात बोलतात. शासकीय कार्यालयात वरिष्ठांकडून महिला कर्मचार्यांना असभ्य वागणूक देणे हा गुन्हा आहे. या प्रकरणाची एकादया महिला अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून चौकशी करण्याची मागणी अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केली आहे.
कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यासारख्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांमुळे गडचिरोली जिल्हयातील पुल व रस्ते बांधकामाचा बोजवारा उडाला आहे. साखरवाडे हे शासकीय नियम धाब्यावर बसवून हूकूमशाही पध्दतीने कारभार करीत आहेत. जनतेचा शासन व प्रशासनाप्रती विश्वास कायम ठेवण्यासाठी कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांना सेवेतून निलंबीत करण्यात यावे आणि त्यांची गडचिरोली जिल्हयातून तात्काळ हक्कालपटी करण्यात यावी अशी मागणी लोकनेते तथा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांनी धरणे आंदोलनातून केली. अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशाराही अरविंदभाऊ कात्रटवार यांनी दिला आहे.
भ्रष्टाचारी अभियंत्यांचे शासनाने लाड करू नये : प्रकाशजी ताकसांडे
जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांनी छेडलेले आंदोलन हे भ्रष्टाचाराविरोधात पुकारलेले जनआंदोलन आहे. गडचिरोली जिल्हा अद्यापही राज्यातील मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्हयातील ग्रामीण भागात आजही रस्त्यांची समस्या आहे. अनेक गावात तर जाण्यासाठी अद्यापही पक्के रस्तेच नाही ही शोकांतिका म्हणावे लागेल. ज्यांच्याकडे रस्ते विकास व नदी, नाल्यांवर पुल बांधकामाची जबाबदारी आहे, ते अधिकारीच थातूरमातूर कामे करून शासकीय निधीची उधळपट्टी करीत असतील आणि कामे न करता कामाची देयके काढणे तर हा गंभिर गुन्हा आहे. विकासाच्या नावावर शासकीय निधीचा गैरवापर करून भ्रष्टाचाराच्या मार्गाने पैसे कमाविणाऱ्या अधिकाऱ्यांचे शासनाने लाड न करता कठोर कारवाई केली पाहिजे, असे स्पष्टोंक्ती सामाजिक कार्यकर्ते प्रकाशजी ताकसांडे यांनी धरणे आंदोलनाप्रसंगी करीत मुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री देवेंद्र फडणविस यांनी या प्रकरणाकडे गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी सुध्दा केली.
याप्रसंगी यादवजी लोहंबरे, विनोद चापले, शाम झोडे, मोतीराम भुरसे, गोपाल मोंगरकर, जगण चापले, यादव चौधरी, बळीराम गेडाम, तानबा दजगाये, शुभम कुकडकर, भूषण लोहंबरे, भीमराव ठाकरे, चांगदेव कोहपरे, गणेश वाघमारे, पितांबर नैताम, नक्टू कलसर, राहुल ठाकरे, भूषण ठाकरे, शुभम समर्थ, प्रवीण म्हस्के, अजय संदोकर, विजय मत्ते, बालाजी चापले, भवन चापले, पूनम झंझाळ, निखिल कुढवे, विकी वाडणकर, विकास ठाकरे, राहुल ठाकरे, साहिल कोहपरे, रोहित चणेकार, चैतन्य मेश्राम, ढिसू ढवळे, लक्ष्मण चौधरी, राजेंद्र ढवळे, दुर्योधन भैसारे, सुधाकर ढवळे, भूषण गुरुकार, महेश खेडेकर, चंद्रशेखर पेंदाम, सुनील कोसमशिले, मनोहर कोसनशिले, दीपक कोसनशिले, प्रशांत मडावी, मंगल भरणे, मोहित, अनुज कुमोटी, प्रकाश भजभुजे, सूरज वाघाडे, रुपेश ठाकरे, मोहित पेंदाम, जितेंद्र वाघमारे, समीर ठाकरे, ढेकलु वाघमारे, आबाजी ठाकरे, आशिक उईके, प्रांजल कोलते, सौरव कोलते, रुपेश कोलते, साहिल कोलते, प्रदीप सोरते, सोनू सोरते, फाल्गुन समर्थ, महेश भोयर, अजित समर्थ, मिलिंद आत्राम, मंथन परचाके, अण्णाजी आत्राम, नैतिक भजभुजे, रोहित आत्राम, समीर आत्राम, गुरुदेव सूर्यवंशी, अरुण भोयर, रमेश भजभुजे, राजू डाहाले, चुडाराम राऊत, लुमाजी मुंघाटे, भगवान चणेकार, देकलु वाघमारे, अमित मेश्राम, महेश लाकडे, दीपक लाडे, राहुल सावरकर, विश्वनाथ भनारकर, कैलास लाडे, अमोल भैसारे, हिरो हर्षे, नयन भोयर, मधुकर उंदिरवाडे, बळीराम बळोशे, कौशिक ढोलणे, प्रकाश ढोलणे, संगम जांभूळकर, समीर ढोलणे, समीर चौधरी, कुंदन वाकडे, कुणाल चूधरी, शेखर दोडके, माऊली श्रीरामे, देवेंद्र मुळे, अशोक राखडे, दिलीप वलादी, अमित हुलके, सारंग सेलोटे, रणजीत वलादे, नंदू भाऊ शेडमाके, कुमोद खेवले, दीपक सेलोटे, गणेश बाबनवाडे, मधुकर बावणवाडे, गंधर्व वलादे, गजानन मडावी, दीपक कोहरे, नामदेव भुसारी मनोहर भोयर, देविदास बांबोडे, विनोद डोंगरे, पुरुषोत्तम पोवणकर, केशव बांबोडे, हिरामनजी आवारी, अरविंद भुसारी आदी उपस्थित होते.







