Home गडचिरोली खते व बियाणांचा तुटवडा दूर करण्यात यावा : संतोष ताटीकोंडावार

खते व बियाणांचा तुटवडा दूर करण्यात यावा : संतोष ताटीकोंडावार

22
Oplus_16908288

– तहसीलदारामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आगामी खरीप हंगामात जिल्ह्यात खत व बियाणांचा तुटवडा निर्माण होऊ नये याकरिता प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्यात याव्या, अशी मागणी जनकल्याण समाजोन्नती समितीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी केली. यासंदर्भात ताटीकोंडावार यांनी तहसीलदारामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

Oplus_16908288

जून महिना सुरू होताच शेतकऱ्यांना रासायनिक खते व बियाणांची मोठ्या प्रमाणात गरज भासते. परंतु ऐन हंगामात अनेकदा तुटवडा निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांमध्ये पुरेशा प्रमाणात कृषी साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी ताटीकोंडावार यांनी केली आहे.

तसेच बाजारात कृत्रिम टंचाई, काळाबाजार आणि चढ्या दराने कृषी साहित्यांची विक्री करणाऱ्या नफेखोरांवर कृषी विभागाने नियमित तपासणी करून कठोर कारवाई करावी, अशीही मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी निवेदनातून केली आहे.

error: Content is protected !!