आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

107

गडचिरोली : आमदार डॉ. देवराव होळी यांच्या पुढाकाराने व बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा यांच्या प्रयत्नाने मंजुर झालेल्या चामोर्शी तालुक्यातील मक्केपली येथील रस्ता व नाली बांधकामाचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, महामंत्री साईनाथ बुरांडे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रतिक राठी यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते. चामोर्शी तालुक्यात अनेक गावांत विकासात्मक कामे मंजुर झालेली असून त्याचे टप्याटप्याने भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार डॉ. देवराव होळी यांनी यावेळी दिली.